आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंदिरातील सजावट ठरली लक्षवेधी
नितीन गावडे l चौके – :- चौके गावची ग्रामदेवता आई भराडी देवीचा जत्रोत्सव मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात व भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
यावेळी मंदिर परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई- तसेच तसेच मंदिरातील मंदिरातील मंदिरातील गाभाऱ्यात सभा मंडपात गावातील तरुणांनी केलेली नयनरम्य सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे देवदेवतांची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर सकाळी दहा वाजता गावातील प्रमुख मानकरांच्या उपस्थितीत भराडी देवीला सांगणे करून पालटकर कुटुंबाकडून मानाची ओटी भरण्यात आली.यानंतर इतर ओट्या भरून जत्रौस्तवाला सुरुवात झाली सकाळी सुरू झालेल्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालू होत्या. सकाळपासून सुरु असलेली सुमधुर भक्ती गीत आणि संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या सभोवताली थाटलेली विविध प्रकारची दुकाने भाविकांना आकर्षित करीत होती. सायंकाळनंतर जत्रा उत्सवला भाविकांची गर्दी वाढत होती मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता श्री भराडी देवीच्या दर्शनाला मोठ्या रांगा लागल्या होत्या मानकरी ग्रामस्थांच्या सुनियोजीत नियोजनामुळे मंदिरा बाहेर मोठया स्क्रीनवरही भाविकांना सुलभ दर्शन घेता आले.. रात्री उशिरा भाविकांच्या अलोट गर्दीत मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि आम्रड येथील पारंपारिक वाद्य यामुळे पालखी प्रदक्षिणेला मोठी रंगत आली. वार्षिक चेंदवण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्य प्रयोगाने या जत्राउस्तवाची सांगता झाली..
या जत्रोत्सवास जिल्हाधिकारी मॅडम यांच्या सहित मालवण तालुक्यातील अनेक शासकीय अधिकारी, जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी, व्यावसायिक तसेच मालवण तालुक्यातील पत्रकार बंधूंनी सहभाग घेतला..
चौके ग्रामदेवता भराडी देवीच्या जत्रोत्सवाची कीर्ती दैनिक प्रहार च्या वतीने मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली होती. गावातील प्रमुख मानकरी यांच्या उपस्थितीत दैनिक प्रहार च्या या पुरवणीचे अनावरण करण्यात आले. यावेळी मानकरी ग्रामस्थ यांनी दैनिक प्रहार चे आभार मानले.










