वैभववाडी | प्रतिनिधी : कुंभवडे गावठणवाडी येथील सुनंदा मोहन तावडे वय 85 यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. वैभववाडी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तावडे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात पती मोहन शंकर तावडे (निवृत्त शिक्षक), तीन मुलगे, मुली, सुना, जावई व नातंवंडे असा परिवार आहे. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी मोठी गर्दी
केली होती.











