वैभववाडीत भाजपाची टिफिन बैठक संपन्न

 

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी भाजपाच्या वतीने टिफिन बैठक पार पडली. हा कार्यक्रम भाजपा वैभववाडी अध्यक्ष नासीर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाला विधानसभा सयोंजक मनोज रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, माजी सभापती अरविंद रावराणे, वाभवे – वैभववाडी चे नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, महीला अध्यक्ष प्राची तावडे, माजी सभापती स्नेहलता चोरगे, सिमा नानिवडेकर, हर्षदा हरयाण, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती बाळा हरयाण, माजी अध्यक्ष राजेंद्र राणे, रत्नाकर कदम, सर्व नगरसेवक, आजी माजी सभापती, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष, सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.