शिवसेनेच्या उच्चशिक्षित उमेदवार सौ. पुनम चव्हाण मालवण नगरपरिषद प्रभाग ४ ब मधून निवडणूक रिंगणात

जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहता व्यक्त करण्यात येत आहे विजयाचा विश्वास

मालवण | प्रतिनिधी : मालवण पालिकेच्या प्रभाग ४ ब मधून शिवसेनेच्या वतीने सौ. पूनम नागेश चव्हाण निवडणूक रिंगणात आहेत. उच्चशिक्षित उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. सोबतच त्यांची वक्तृत्व व संवाद शैली पाहता हक्काच्या उमेदवार म्हणून जनतेतून त्यांना प्रतिसाद मिळतं आहे. प्रचाराच्या पहिल्या फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहता विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

मालवण नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात अनेक दिग्गज उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात काही ठिकाणी , उच्च शिक्षित व सामाजिक क्षेत्रात कार्यरत मंडळींचा समावेश असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा नगरसेवकांची खरी गरज असल्याचे बोलले जात आहे आहे. प्रभाग क्र. ४ ब मधून शिवसेनेने अशाच एका महिला उमेदवाराला संधी दिली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. सरोज परब यांची सुकन्या सौ. पूनम परब – चव्हाण या एक अभ्यासू उमेदवार डॅशिंग नेतृत्व म्हणून पाहिल्या जातात. एक अभ्यासू व सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी कायद्याची पदवी घेतली असून काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून सेवा दिली आहे. एम ए, बी.एड, D Ted या पदव्या त्यांनी घेतल्या आहेत.

 

 

जनतेत राहून काम करणारे त्यांच्या सुख दुःखात धावून जणारे हे नेतृत्व महिला भगिनींना आपलेसे वाटते. अश्या भावना व्यक्त होत आहेत. एकूणच त्यांना मिळणरा प्रतिसाद पाहता त्यांच्या विजयाचा विश्वास सहकारी व्यक्त करत आहेत.