रत्नागिरी जिल्ह्यातील हरविलेले 187 मोबाइल नागरिकांना परत

रत्नागिरी ः
पोलीस अधीक्षक नितिन बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामूनी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामधील नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती सायबर पोलिस ठाण्यामार्फत घेउन त्यांचा शोध घेउन ते नागरिकांना विशेष पोलिस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्याहस्ते सोमवार 24 नोव्हेंबर रोजी परत करण्यात आले.
या गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, पोलिस शिपाई अजिंक्य ढमढेरे यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस अंमलदार यांनी एकत्रित काम करुन गहाळ झालेल्या सर्व मोबाईलचा शोध घेतला.व या प्रक्रियेत एकूण 187 मोबाईलचा शोध घेउन ते पतर मिळवण्यात रत्नागिरी पोलिस दलाला यश आले आहे. सोमवार 24 नोव्हेंबर रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र संजय दराडे(भा.पो.से) यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. तसेच सायबर क्राईम सारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे,अपर पोलिस निरीक्षक बी.बी.महामूनी,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी लांजा सुरेश कदम व पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.