पोलिस दलाच्या ‌‘सोशल मिडीया लॅब” चे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी ः
पोलिस दलाच्या ‌‘सोशल मिडीया लॅब” चे सोमवार 24 नोव्हेंबर रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय दराडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस निरीक्षक बी.बी.महामूनी तसेच इतर पोलिस अधिकारी व अंमदारही उपस्थित होते.
या पोलिस “सोशल मिडिया लॅब”व्दारे सोशर मिडीयावर होणाऱ्या विविध घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्यात येणार व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर त्वरीत कारवाई करण्यास ही लॅब महत्वाची ठरणार आहे. तसेच या लॅबचा उपयोग प्रॉडक्टिव्ह पोलिसिंगसाठी करण्यात येणार असून, सोशल मिडया ट्रेंडचा मागोवा घेउन भविष्यात घडू शकणाऱ्या गुन्ह्यांचा अंदाज घेण्यासाठीही याचा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांनी सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक व सतर्ककतेने करावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी सर्वांना केले आहे.