वनविभागाचे अधिकारी मात्र सुशेगाद
वैभववाडी l प्रतिनिधी : वाभवे – वैभववाडी शहरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. मध्यरात्री बिबट्या रस्त्यावर कुत्र्याचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. मुख्य बाजारपेठेतच बिबट्याच्या वावराने नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. संबंधित यंत्रणेने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांमधून केली जात आहे.
वैभववाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या गावात अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाले आहे. बऱ्याच ठिकाणी बिबट्याने पाळीव जनावर हल्ला केल्याची उदाहरणे आहेत. मात्र आता बिबट्याने आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे. वैभववाडी बाजारपेठेपासून 300 मीटर अंतरावर बिबट्या कुत्र्याच्या मागे पाठलाग करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. या प्रकारामुळे वाभवे – वैभववाडी शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र वनविभाग सुशेगाद आहे. आहे.












