पाली: लांजा, राजापूर, आणि साखरपा तालुक्याचे आमदार किरण सामंत यांनी नुकतीच पत्नीसह पाली येथील प्रसिद्ध दत्त साई मंदिरला भेट देऊन मनोभावे देवदर्शन घेतले.
पाली बस स्थानकाजवळ वसलेले हे दत्त साई मंदिर किरण सामंत यांच्या विशेष सहकार्यातून उभे राहिले आहे.
याप्रसंगी, देवस्थानच्या वतीने आमदार सामंत आणि त्यांच्या पत्नी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सागर सावंत, तसेच पप्पा चौगुले, दिलीप सावंत, विजय चव्हाण यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि पाली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











