मसुरे | झुंजार पेडणेकर तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण, कृषि विज्ञान केंद्र किर्लोस व ग्रामपंचायत कार्यालय मर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत मर्डे येथे 5 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.












