वालावलकर रुग्णालयात मेंदूच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफी तपासणीचा ७५ रुग्णांनी लाभ घेतला

रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश

चिपळूण: वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे सेरेब्रल अँजिओग्राफी व स्ट्रोक व्यवस्थापन शिबिर व कार्यशाळा पार पडली.

सध्याच्या गतीशील जीवनात मेंदूरोग, लकवा, ब्रेन हिमोरेज म्हणजे मेंदूतील रक्तस्त्राव अश्या आजारात मधुमेह आणि उच्च रक्दाब यामुळे लक्षणीय वाढ झाली आहे. एकदा का पॅरालीसीस झाला की व्यक्ती कायमची अधू होते आणि त्याचा विपरीत परिणाम सर्व कुटुंबावर होतो. पण आता विज्ञानामधील प्रगतीमुळे ह्यावर उत्तम उपाय उपलब्ध झाले आहेत. मुंबईमधील के.ई.एम ह्या नामवंत रुग्णालयातून न्यूरोसर्जेरी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन डांगे (संचालक व विभागप्रमुख, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व स्ट्रोक) आणि त्याचे सहकारी न्यूरो सर्जन डॉ. मयूर घरात आणि डॉ. कुशल भाटिया (सल्लागार – मेंदू आणि मणक्याचे इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व स्ट्रोक) यांनी वालावलकर रुग्णालयाला भेट देऊन कोकणातील गोर- गरीब रुग्णांमध्ये
जनजागृती करून ही अद्ययावत यंत्रणा त्यांना कशी पुरवता येईल यावर सर्व डॉक्टर्सना आणि जनरल प्रॅक्टिशनरना मार्गदर्शन केले. या शिबिरात जवळ जवळ ५० रुग्णांनी लाभ घेतला. रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, पोलादपूर, इंदापूर, माणगाव, महाड, दापोली, खेड,अलोरे इत्यादी गावातील रुगणांनी लाभ घेतला. त्याशिवाय २५ रुग्णांना तपासून त्यातील २ रुग्णांवर मेंदूची अँजिओग्राफी केली. यासाठी वालावलकर रुग्णालयातील डिजिटल सब ट्रॅक्शन लॅब ची अद्ययावत सुविधेचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे रुग्णांला जर पॅरालीसीसची लक्षणे दिसू लागली. तर त्याच्यावर चार तासांच्या आत रुग्णालयात दाखल होऊन कोणती रक्त वाहिनी ब्लॉक झाली आहे. हे समजण्यासाठी आता या अँजिओग्राफीची मदत होणार आहे. या सुविधेमुळे त्यावर तात्काळ उपचार होऊन रुग्णाला पॅरालीसीस पासून पूर्ण संरक्षण मिळू शकेल असे मत डॉक्टर नी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी विशेषतः जनरल प्रॅक्टिशनर आणि बी. एच. एम. एस डॉक्टर आणि ज्येष्ठ रहिवाशांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळासाठी जवळजवळ १४५ जण उपस्थितीत होते. या नवीन उपचार पद्धतीमुळे पॅरालीसीसचा धोका असलेल्या रुग्णांना नवे बळ मिळणार आहे. त्यामुळे हात पायाला अचानक मुंग्या येणे. एका बाजूची शक्ती कमी होणे, तोंड वाकडे होणे, अति तीव्र डोके दुखी मुळे चक्कर येणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष ना करता चार तासाच्या आता रुग्णालय गाठले तर या आजारावर मात करणे शक्य होणार आहे.