पाटकर हायस्कूल मध्ये आयोजित हार्मोनियम संगीत कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद…

वाद्य व संगीत यांची विद्यार्थ्यांमध्ये 

आवड निर्माण व्हावी यासाठी आयोजन 

वेंगुर्ले : प्रतिनिधी :विद्यार्थ्यांमध्ये वाद्य व संगीत यांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने रा. कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्ले येथे नाद अकादमी कुडाळ यांच्या मार्फत हार्मोनियम संगीत कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळे मध्ये विद्यार्थ्यांना हार्मोनियम कसे वाजवावे व स्वरांचे गायन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. काही गाणी ही या निमित्ताने हार्मोनियमवर गायली गेली. असा सुरेख व मंत्रमुग्ध करणारा संगीतमय कार्यक्रम आचरेकर सर व त्यांचे सहाय्यक श्री. गोपाळ पवार व श्री. पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. समीर पेडणेकर सर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत पुष्प देऊन श्रीम. उज्जयनी मांजरेकर मॅडम, श्री. गोपीचंद बागुल सर, श्री. संजय पोटफोडे सर यांनी केले.

श्रीम. सविता जाधव मॅडम, सौ. स्वप्नाली पिळणकर मॅडम, सौ. मनीषा खरात मॅडम यावेळी उपस्थित होते. सौ. खरात यांच्या माध्यमातून व मुख्याध्यापक श्री. आत्माराम सोकटे सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. महेश बोवलेकर सर यांनी मांनले.