विज्ञान प्रदर्शनात दत्ताराम लाड, ओम आंबेरकर प्रथम !         

मालवण तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनाची उत्साहात सांगता.

मसुरे | झुंजार पेडणेकर :                                 मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे मर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विभागातून दत्ताराम लाड, माध्यमिक विभागातून ओम आंबेरकर तर शिक्षक निर्मित प्रतिकृती मधून डी. एन. प्रभूगावकर (प्राथमिक )विष्णू काणेकर (माध्यमिक ) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व विजेत्यांना मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस देण्यात आले.

विज्ञान प्रदर्शनाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थी प्रतिकृती प्राथमिक विभाग 1) दत्ताराम आनंद लाड (आडवली हायस्कूल- जीवन रक्षक प्रणाली), 2) वेदा प्रवीण मराठे (कट्टा हायस्कूल -पेडल वॉटर टँक), 3) मानवी विष्णू घाडीगावकर (प्रगत विद्यामंदिर रामगड -करूया व्यवस्थापन कचऱ्याचे). विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक विभाग 1) ओम चंद्रशेखर आंबेरकर (टोपीवाला हायस्कूल मालवण ) 2) ओमतेज उल्हास तारी( प्रगत विद्यामंदिर रामगड – श्रावणचक बहू उपयोगी कॅल्क्युलेटर ), 3) ऋषभ बळीराम गावकर( पोईप हाय स्कूल- स्मार्ट वॉटर इरिगेशन सिस्टीम). शिक्षक प्रतिकृती प्राथमिक विभाग 1) डी. एन. प्रभूगावकर (जिल्हा परिषद शाळा रेवतळे – मॅथ्स फन फेअर), 2) आसमा उमर तांबोळी (जिल्हा परिषद केंद्र शाळा सुकळवाड- मॅजिकल नंबर), 3) बाळकृष्ण धोंडी नांदोस्कर (जिल्हा परिषद केंद्र शाळा सुकळवाड जादुई पुस्तक).

शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभाग 1) विष्णू दत्ताराम काणेकर( माध्यमिक विद्यालय शिरवंडे- चमत्कार प्रकाशाचा), 2) संदीप अशोक अवसरे (भंडारी हायस्कूल मालवण- न्यूटनचा गतीविषयक नियम), 3) दत्तप्रसाद प्रदीप परुळेकर (चौके हायस्कूल प्रेशर वोल्युम रिलेशन).

प्रयोगशाळा परिचर 1) विजय वामन लिंगायत (प्रगत विद्यामंदिर रामगड -तंत्रदृष्टी झूम पेन), 2) संदीप आत्माराम धामापूरकर (शिवाजी विद्यामंदिर काळसे -मेंदूचे भाग व होलोग्रम), 3) संजय राठोड (कुडाळकर हायस्कूल मालवण- जलशुद्धीकरण).

विद्यार्थी प्रतिकृती दिव्यांग विभाग -प्राथमिक विभाग 1) समृद्धी गुरुनाथ चव्हाण (प्रगत विद्यामंदिर रामगड -घरकामात दिव्यांगाने मदत करणारी साधने), 2) अपूर्वा तुकाराम राणे (चौके हायस्कूल- वॉटर कुलर), 3) पार्थ पराग तोंडवळकर (कन्याशाळा मालवण -स्वच्छता रक्षक).

विद्यार्थी प्रतिकृती दिव्यांग -माध्यमिक विभाग 1) ओंकार पंकज राणे (प्रगत विद्यामंदिर रामगड दिव्यांग सोबती), 2) लीना वांयगणकर (ज्ञानदीप विद्यालय वांयगणी- कार्बन टू इंक ), 3) ओम महेश करावडे (चौके हायस्कूल -रेन डिटेक्टर).

वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक 1) आदित्य प्रभूगावकर (टोपीवाला हायस्कूल जलसंवर्धन काळाची गरज ), 2) प्रिया विलास पेंडूरकर ( न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर -जलसंवर्धन काळाची गरज), 3) सृष्टी संजय गावडे (प्राथमिक शाळा हेदुळ -हरित ऊर्जा).

वक्तृत्व स्पर्धा -माध्यमिक 1) वेदांत नाईक (टोपिवाला हायस्कूल- भारतीय स्थापत्य कलेतील गणित व विज्ञान), 2) पुष्पक गोलतकर (ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी सिंधुदुर्गातील शेती संधी आणि आव्हाने ), 3) चित्रा लक्ष्मण परब.

निबंध स्पर्धा प्राथमिक विभाग 1) भाग्यश्री विलास हडकर 2) प्रांजली घाडीगावकर 3) वंशिका निलेश खोत. निबंध स्पर्धा -माध्यमिक 1) चैतन्य भोगले,2) भार्गवी संतोष नांदोस्कर,3) सिद्धी गोपाळ जाधव.

प्रश्नमंजुषा स्पर्धा प्राथमिक विभाग 1) अमोल उमेश मालपेकर, किरण नंदकुमार सावंत (वायंगणी हायस्कुल ), 2) आदित्य देविदास प्रभूगावकर, अस्मि अशोक आठलेकर (टोपीवाला हायस्कूल मालवण).

प्रश्नमंजूषा स्पर्धा माध्यमिक विभाग 1)रोशन साळुंके,आदित्य बर्डे (टोपीवाला हायस्कुल ), 2) विराज विश्वनाथ परब,अथर्व अमित कुशे (भरतगड इंग्लिश मिडीयम मसुरे ).

यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने, शाळा समिती अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, प्रशांत पारकर, डॉ अनिरुद्ध मेहेंदळे, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, संतोष सावंत, सन्मेष मसुरेकर, जगदीश चव्हाण, देऊ जंगले, श्रीकृष्ण सावंत, गुरुनाथ ताम्हणकर,नंदकिशोर गोसावी तसेच तालुक्यातील शिक्षक संस्था सभासद आणि मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात माध्यमिक विभागातून 28 विद्यार्थी प्रतिकृती, प्राथमिक विभागातून 30 विद्यार्थी प्रतिकृती, दिव्यांग विद्यार्थी गटातून 7 प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या.विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे व विकसित भारत घडवणे हा आहे.विद्यार्थ्यांनी गुगल, चॅट जीपीटी, ए आय, जेमिनी, नोटबुक एल एम यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. आपल्या तालुक्यातून सुद्धा भावी वैज्ञानिक घडावे असे आवाहन यावेळी मालवण गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी केले. यावेळी मान्यवरानी मार्गदर्शन केले. उदघाट्न शाळा समिती अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या हस्ते झाले.सूत्रसंचलन सायली म्हाडगूत आभार संतोषी मांजरेकर यांनी मानले.