केंद्रात १२५ गुण मिळवून ऐतिहासिक विजय प्राप्त
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आंजनारी मराठी शाळेने केंद्रीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून केंद्रात १२५ गुण मिळवून ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. लहान गटात श्रेयश शिखरे याने लांब उडी, धावणे, गोळा फेक, थाळीफेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
केंद्रीय क्रीडा स्पर्धा नुकताच पार पडल्या यामध्ये अंजनाळी मराठी शाळेने ऐतिहासिक या संपादन केले आहे.शाळेला मिळालेली सांघिक बक्षिसे पुढील प्रमाणे – खो-खो मोठा गट मुली – विजेता, खो-खो मोठा गट मुले – विजेता , खो-खो लहान गट मुली – विजेता खो-खो लहान गट मुले- विजेता. तसेच कब्बडी लहान गट मुली – विजेता, लंगडी लहान गट मुली – उपविजेता.
वैयक्तिक या प्रकारामध्ये धावणे – पियुष रमेश पेंढारी ( द्वितीय ), उंच उडी – पियुष रमेश पेंढारी ( प्रथम ), लांब उडी – पियुष रमेश पेंढारी ( प्रथम )
थाळी फेक – समीक्षा विलास गुरव ( प्रथम ),लांब उडी – भक्ती प्रदीप पेंढारी ( प्रथम ),धावणे – भक्ती प्रदीप पेंढारी ( प्रथम ).
लहान गटात वैयक्तिक क्रीडा प्रकारात श्रेयस प्रकाश शिखरे याने लांब उडी,धावणे, गोळा फेक व
थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर
लांब उडी – विदिता योगेश नरिम ( प्रथम ).










