“नमन कलारत्न” पुरस्कारासाठी काशिनाथ गोरुले यांची निवड

आई जिवदानी कला फाऊंडेशन मुंबई करणार गौरव

चिपळूण (वार्ताहर) : आई जिवदानी कला फाउंडेशन (मुंबई) संस्थेच्या वतीने दिला जाणारा “नमन कलारत्न” पुरस्काराने काशिनाथ लक्ष्मण गोरुले यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार रविवार २१ रोजी विरार येथे होणाऱ्या कार्यक्रमात दिला जाणार आहे.
कोकणात प्रसिद्ध असलेल्या नमन कलेचा उत्कृष्ट संगीतकार म्हणून संगमेश्वरमधील काशिनाथ गोरुले यांना देण्यात येणार आहे. देवरुख जवळ महिमत गडाच्या पायथ्याशी असलेल्या निगुडवाडी या गावचे ते सुपुत्र आहेत. या गावातून त्यांनी आपल्या संगीत कलेला सुरुवात केली. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सोळंकी विद्यालय, साईनाथ नगर, चंदनसार रोड, विरार (पूर्व) येथे नमन कलेतील मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. नमन कलाकार, नमन प्रेमी यांनी आवर्जून या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन आई जिवदानी कला फाऊंडेशन (मुंबई) चे संस्थापक अध्यक्ष भिकाजी तानू भुवड आणि सहकारी यांनी केले आहे.