फोंडाघाट येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेश (भाई ) मोदी यांचे दुःखद निधन !

फोंडाघाट /कुमार नाडकर्णी— फोंडाघाट येथील प्रतिथयश भुसारी पेढी चे सहमालक, रमेश तथा भाई जगन्नाथ मोदी (७१ वर्षे) यांचे शुक्रवार रात्री राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. मंदस्मित हास्य, मितभाषी आणि मिस्कील स्वभावामुळे ते सुपारिचित होते. सध्या प्रकृती बरी नसल्याने त्यामुळे ते घरीच राहत.त्यांच्या पश्चात तीन भाऊ, तीन बहिणी, वहिनी , मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. फोंडा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुहास यांचे ते बंधू, तर माहिती तंत्रज्ञान अभियंता सिद्धेश मोदी यांचे ते पिताश्री होत….