कुडाळच्या लक्ष्मीवाडीत ११ ते २० दरम्यान श्रीदेवी महालक्ष्मी उत्सवाची धूम!

कीर्तन, भजन, दशावतार नाट्यप्रयोग, फुगडी, गरबा-राससह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

स्वप्निल कदम -कुडाळ :
श्रीदेवी महालक्ष्मी उत्सव मंडळ, लक्ष्मीवाडी, कुडाळ यांच्या वतीने रविवार, ११ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्रीदेवी महालक्ष्मी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त घटस्थापना, कीर्तन, भजन, होम मिनिस्टर, संगीत खुर्ची, दशावतार नाट्यप्रयोग, वारकरी दिंडी भजन, फुगडी, हळदीकुंकू, डबलबारी भजन आणि गरबा-रास अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

रविवार, ११ ऑक्टोबर : सकाळी १० वाजता घटस्थापना, सायंकाळी ७.३० वाजता ह.भ.प. दत्तात्रय उपाध्याय (वालावल) यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता श्री महालक्ष्मी भजन मंडळ, काळकवाडी यांचे भजन, तर रात्री १० वाजता होम मिनिस्टर व संगीत खुर्ची कार्यक्रम होणार आहे.

सोमवार, १२ ऑक्टोबर : सायंकाळी ७.३० वाजता कीर्तन, रात्री ९ वाजता श्री नृसिंह भजन मंडळ, कुडाळ यांचे भजन, तर रात्री १० वाजता ‘मिसेस लक्ष्मीवाडी २०२६’ हा कार्यक्रम होईल.

मंगळवार, १३ ऑक्टोबर : सायंकाळी ५ वाजता नामस्मरणाचा कार्यक्रम, त्यानंतर7.30 कीर्तन, रात्री ९ वाजता श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ, लक्ष्मीवाडी यांचे भजन, तर रात्री १० वाजता वारकरी दिंडी भजन मंडळ, कुडाळ यांचे वारकरी दिंडी भजन सादर होईल.

बुधवार, १४ ऑक्टोबर : सायंकाळी ७.३० वाजता कीर्तन, रात्री ९ वाजता भजन श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन, तर रात्री १० वाजता श्रीदेवी भूमिका दशावतार नाट्य मंडळ, सावंतवाडी यांचा ‘साईबाबा’ हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

गुरुवार, १५ ऑक्टोबर : ललित पंचमीनिमित्त सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता श्री देव भैरव-जोगेश्वरी महिला फुगडी मंडळाची फुगडी, रात्री ९ वाजता उमळकर प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ यांचे भजन, तर रात्री १० वाजता ‘नवचंडी याग’ हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.

शुक्रवार, १६ ऑक्टोबर : सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू कार्यक्रम, सायंकाळी ७.३० वाजता कीर्तन, रात्री ९ वाजता गजानन प्रासादिक भजन मंडळ, मडवळवाडी, कुडाळ यांचे भजन, तर रात्री १० वाजता कालिका समई नृत्य महिला मंडळ, डीगस यांचा समई नृत्याचा कार्यक्रम होईल.

शनिवार, १७ ऑक्टोबर : सायंकाळी ७.३० वाजता कीर्तन, रात्री ९ वाजता महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ, कांबळीवाडी, कुडाळ यांचे भजन, तर रात्री १० वाजता महापुरुष नळ्याचा पाचार, वेताळ बांबर्डे यांचे गोपनृत्य सादर होणार आहे.

रविवार, १८ ऑक्टोबर : सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता तीर्थप्रसाद, सायंकाळी ७.३० वाजता कीर्तन, तर रात्री ९ वाजता श्री देव भुलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, देवगडचे बुवा संतोष जोईल आणि हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे बुवा गुंडू सावंत यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे.

सोमवार, १९ ऑक्टोबर : रात्री ७.३० वाजता सद्गुरू संगीत भजन मंडळ, पिंगुळी यांचे भजन, रात्री ९ वाजता अंबाबाईचा लव व आरती, तर रात्री ९.३० वाजता बँजोच्या तालावर गरबा-रास होणार आहे.

मंगळवार, २० ऑक्टोबर – विजयादशमी : रात्री ८ वाजता श्री महालक्ष्मी मित्र मंडळ, लक्ष्मीवाडी यांचे भजन, तर रात्री ९ वाजता शुक्रतारा बीट्स, मालवण यांच्या बँजोच्या तालावर गरबा-रास रंगणार आहे.

या उत्सवातील सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी महालक्ष्मी उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.