*देवरूख नगरपंचायत निकाल*
देवरूख नगरपंचायतीवर महायुतीची सत्ता
नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये विराजमान
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष
निलेश जाधव / देवरूख
प्रभाग क्र. १ ते प्रभाग क्र. १७ चे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
१ समृद्धी वेलणकर (भाजप)
२ यशंवत गोपाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
३ दिपक गेल्ये (शिवसेना शिंदे गट)
४ वैभव पवार (शिवसेना शिंदे गट)
५ स्वाती राजवाडे (भाजप)
६ प्राची भुवड (राष्ट्रवादी अजित पवार गट)
७ श्रद्धा इंदुलकर (भाजप)
८ सिद्धेश वेल्हाळ (अपक्ष)
९ कविता नार्वेकर (अपक्ष)
१० अक्षय झेपले (अपक्ष)
११ अनुराग कोचिरकर (अपक्ष)
१२ बाळा कामेरकर (शिवसेना ठाकरे गट)
१३ रितिका कदम (शिवसेना ठाकरे गट)
१४ नेहा आंबेकर (शिवसेना शिंदे गट)
१५ निधा कापडी (शिवसेना ठाकरे गट)
१६. दिपक खेडेकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)
१७ रुपाली बेंद्रे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
*प्रभाग क्र. १ ते प्रभाग क्र. ९ मध्ये महायुतीची सरशी*
*विजयी उमेदवार खालीलप्रमाणे*
प्रभाग क्र. १. समृद्धी वेलवणकर (भाजप)
प्रभाग क्र. २. यशवंत गोपाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
प्रभाग क्र. ३. दिपक गेल्ये (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग क्र. ४. वैभव पवार (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग क्र. ५. स्वाती राजवाडे (भाजप)
प्रभाग क्र. ६. प्राची भुवड (राष्ट्रवादी अजित पवार गट))
प्रभाग क्र. ७. श्रध्दा इंदुलकर (भाजप)
प्रभाग क्र. ८. सिध्देश वेल्हाळ (अपक्ष)
प्रभाग क्र. ९. कविता नार्वेकर (अपक्ष)
देवरूखच्या नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? नगरसेवक कोण होणार?आज चित्र स्पष्ट होणार
देवरूखवासियांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला
उमेदवारांची मात्र धाकधुक वाढली; तर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्ते सज्ज
निलेश जाधव / देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. सकाळी १० वा. या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी महिला सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे देवरूखची नगराध्यक्षा कोण होणार? तसेच नगरसेवक कोण होणार? याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. तर देवरूखवासियांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. उमेदवारांची मात्र धाकधुक वाढली आहे. या निकालाकडे देवरूखवासियांसह संपुर्ण संगमेश्वर तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. तर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
या निवडणुकीची मतमोजणी देवरुख नगरपंचायत कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. ही मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये होणार असून प्रभाग क्र. 1 ते 9 ची मतमोजणी पहिल्या फेरीत तर प्रभाग क्र. 10 ते 17 ची मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार आहे. सदर मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी / त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे व आदर्श आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. प्रवेशासाठी कार्यालयाकडून मतमोजणी कामी देण्यात आलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. सोबत कोणत्याही स्वरूपाचे Electronic device (Mobile, watch, etc.) आणू नये. आणल्यास प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांना स्वतः/ ०१ मतमोजणी प्रतिनीधी तसेच नगराधक्ष उमेदवारासाठी जास्तीत जास्त ०९ मतमोजणी प्रतिनीधी प्रत्येक टेबलासाठी १ याप्रमाणे यांना उपस्थित राहता येईल. अन्य कोणालाही प्रवेश देता येणार नाही. असे निवडणूक निर्णय अधिकारी अमृता साबळे यांनी सांगितले आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देवरूख शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
नगर सेवक पदाचे प्रभाग निहाय निकाल











