खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा २८ डिसेंबर रोजी भरणे येथे

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी दुपारी ठीक तीन वाजता भरणे येथील श्री काळकाई देवी हॉलमध्ये पार पडणार आहे. तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार असून खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कुणबी समाजातील कर्मचारी, अधिकारी व विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम सामाजिक एकोपा आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वाचा मानला जातो. नव्या वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेत संघटनेच्या कार्याचा आढावा, सामाजिक उपक्रम, तसेच समाजोपयोगी माहितीचा समावेश करण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमास खेड तालुक्यातील कुणबी समाजातील मान्यवर, कर्मचारी बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे सचिव श्रीकृष्ण खांडेकर, कार्याध्यक्ष शैलेश पराडकर आणि कोषाध्यक्ष संतोष गांगरकर यांनी केले आहे. तसेच उपाध्यक्ष प्रकाश कोदारे, नरेश ठोंबरे, निलेश कांदेकर, शरद कदम, रवींद्र हरावडे, प्रमोद म्हादे, सल्लागार विजय बाईत, विलास धामणे, तुकाराम काताळे, सहसचिव संदीप घाडेकर, राजेश भागणे, नवनीत घडशी, तालुका संपर्कप्रमुख संजय जाधव, भागोजी कडव, सचिन गावडे, मुख्य संघटक मनोहर मनोहर, संजय चांदिवडे, दीपक खाडे, प्रदीप घाणेकर, प्रसिद्धीप्रमुख शशिकांत भुवड, अंकुश भानसे, संदीप फागे यांच्यासह महिला प्रतिनिधी सिद्धी जाधव, तृप्ती काताळे, ऋतुजा तांदळे, सनीरीता बाईत, विद्या घडशी, दर्शना शिगवण, अंकिता भागणे, सुमेधा फागे, स्नेहल गावणकर यांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या सोहळ्यामुळे कुणबी कर्मचारी संघाच्या कार्याला नवी दिशा मिळेल तसेच समाजातील बांधवांमध्ये संवाद आणि सहकार्य अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.