लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीकडून सर्व पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन

कंपनीचे स्पष्टीकरण

मुंबई : भारतातील वैविध्यपुर्ण रसायन उत्पादक कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात कारखाना आहे. या कारखान्याचे कामकाज लागू असलेल्या भारतीय पर्यावरणीय, सुरक्षा आणि नियामक आवश्यकतांचे पूर्ण पालन करून सुरू असून स्थापनेपासून सर्व वैधानिक मंजुरी कंपनीने प्राप्त केलेल्या आहेत, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. सर्व प्रक्रिया उत्सर्जने आणि सांडपाणी शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त सुविधेमध्ये योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावली जाते. लोटे सुविधा केंद्रातून पर्यावरणात कोणत्याही प्रकारचे घातक सांडपाणी सोडले जात नाही, असे कंपनीने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

कंपनीच्या लोटे येथील कार्यपद्धतींची माजी इटालियन कंपनी मितेनी एस.पी.ए. (मितेनी) यांच्या कार्यपद्धतींशी केलेली तुलना ही सांडपाणी प्रक्रिया व विल्हेवाट पद्धती आणि उत्पादक पोर्टफोलिओ या दृष्टीने चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे, असे कंपनीने ठामपणे नमूद केले आहे. मितेची प्रकरणामध्ये अनेक दशकांपर्यंत थेट सांडपाणी नद्यांमध्ये सोडण्यात आले होते. त्यामुळे गंभीर पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक परिणाम झाले. भारताच्या कठोर नियामक चौकटी अंतर्गत अशा पद्धतींना परवानगी नाही. येथे कठोर पर्यावरणीय मंजुरी, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि कडक अनुपालन मानके अनिवार्य आहेत, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कंपनीची लोटे उत्पादन सुविधा क्लोज्ड-लूप प्रणालींवर कार्यरत असून त्यामुळे कोणतेही हानीकारक पदार्थ पर्यावरणात सोडले जाण्यापासून प्रतिबंध केला जातो. घातक कचरा आणि सांडपाणी राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त सामायिक घातक कचरा प्रक्रिया, साठवण व विल्हेवाट सुविधाकेंद्रात पाठवले जाते. तिथे त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्यामध्ये जाळून नष्ट करणे (इन्सिनरेशन) याचाही समावेश आहे. कंपनी घातक कचरा व्यवस्थापनासाठी प्रामाणित कार्यपद्धतींचे पालन करते. त्यात पूर्ण डिजिटल ट्रेसिबिलिटी, प्रगत सुरक्षा प्रणाली, उच्च क्षमतेची सांडपाणी प्रक्रिया पायाभूत सुविधा, कंटेन्मेंट (म्हणजेच घातक पदार्थ, कचरा किंवा सांडपाणी ठराविक मर्यादित सुरक्षितरीत्या बंदिस्त ठेवण्याची व्यवस्था) उपाययोजना आणि अभेद्य फ्लोअरिंग यांचा समावेश असून यामुळे कठोर नियामक अनुपालन सुनश्चित होते आणि कोणताही हानीकारक पर्यावरणीय परिणाम होण्यास प्रतिबंध केला जातो.

कंपनीचे लोटे येथील प्रकल्पस्थळ हे बहु-तंत्रज्ञान आणि बहु-उत्पादन स्थळ असून त्यामध्ये फ्ल्युरिनयुक्त आणि नॉनु-फ्ल्युरिनयुक्त उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने, सेमीकंडक्टर्स, संरक्षण, वीज, ग्रिड्स, इलेक्ट्रिक वाहने, वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, कृषिरसायने, औषधनिर्माण उद्योग इत्यादी अनेक नव्या, अत्याधुनिक आणि सध्या सुरू असलेल्या उद्योगांसाठी अत्यावश्यक आहेत. फ्ल्युरिनयुक्त उत्पादने भारतात तसेच जागतिक स्तरावर जबाबदारीने आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात हेही कं पनीने ठोसपणे सांतिले आहे. कं पनी पारदर्शकतेबाबतच्या आपल्या बांधिलकीवर ठाम असून सर्व संबंधित समभागधारक आणि शासकीय प्राधिकरणांशी सक्रियपणे संवाद साधत आहे. असे कंपनीच्यावतीने स्पष्टीकरण करण्यात आले आहे.