सेवानिवृत शिक्षिका विजयालक्ष्मी भोसले यांचा सावंतवाडी येथे सन्मान!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आयोजित पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या मसुरे आर.पी.बागवे हायस्कूलच्या माजी शिक्षिका श्रीम. विजयालक्ष्मी हनुमंत भोसले यांना शाल, श्रीफळ,रोख रक्कम,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन सावंतवाडीच्या नूतन नगराध्यक्षा युवराज्ञी सौ.श्रद्धा राजेभोसले यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले. कविवर्य केशवसुत साहित्य नगरी (राणी पार्वती देवी हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडी) येथे सदर संमेलन संपन्न झाले.

यावेळी अभिनेत्री संपदा कुलकर्णी, साहित्यिक श्री.प्रवीण बांदेकर,माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर,सिंधुदुर्गचे माजी शिक्षणाधिकारी डाॅ.गणपती कमळकर, पत्रकर श्री शेखर सामंत, शिक्षक नेते श्री.म.ल.देसाई,श्री.भरत गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भोसले मॅडम यांना मिळालेल्या शिक्षण क्षेत्रातील या उल्लेखनीय पुरस्काराबद्दल मसुरे,बांदिवडे पंचक्रोशीतून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.