मंडणगड प्रतिनिधी :- कोकणस्थ परिवार पुणे यांच्या वतीने 1 जानेवारी 2026 रोजी संस्थेचे जेष्ठ सदस्य स्व. अशोक अप्पा मयेकर यांच्या 75 व्या जयंती दिनाचे निमित्ताने नेहरु स्टेडियम पुणे येथे आयोजीत कार्यक्रमात राष्ट्रीय अंध क्रीडा पट्टू ना क्रीडा साहित्य चे वाटप करण्यात आले. अंधाच्या क्रिकेटमधील जगज्जेता टीम सदस्य अमोल कर्चे, अप्पा नेवरेकर, प्रिया पेडणेकर व नितीन नेवरेकर यांनी खेळाडूंचा गौरव केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर होते. रुक्मिणी साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शीतल नेवरेकर यांनी प्रास्ताविक केले. हेमलता नेवरेकर यांनी आभार मानले पवन नेवरेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संदीप जाधव, दिनेश पाडाळे, रोहित भरगुने, अक्षय पवळ, वैभव मांडरे, शंतनू धंगेकर, अभिजीत शिरतोडे, प्रज्वल बीरे, चंद्रकांत खराटे, भगवान सुतार, ऋषिकेश राजमाने, देवदान गायकवाड, सोहेल शेख, समीर लोखंडे, अनिता नवगिरे, श्वेता गुप्ता. आरती राठोड, मनीषा तुपारे, पूर्वा महिंद्रकर, करिष्मा कावरे यांचा सत्कार करण्यात आला.












