निवती बंदर येथे किनारा स्वच्छतेने नववर्षाचे स्वागत! मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची उपस्थिती   

मसुरे | झुंजार पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व मेढा ग्रामपंचायत निवतीबंदर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत निवती समुद्र किनारा स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, वेंगुर्ला पं.स.गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, ग्रा.पं. विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, शिक्षण वि.अ. रामचंद्र कोनकर, मेढा ग्रा.पं. सरपंच अवधूत रेगे, उपसरपंच प्रजोत मेतर, ग्रा.पं. अधिकारी शरद शिंदे, प्रतापंडित स्कूल मेढा निवतीचे मुख्याध्यापक विकास आडे, सह शिक्षक चव्हाण, फुलसुंदर, पाणी इस्वच्छता विभाग जि.प. सिंधुदुर्गचे पाटील, कामतेकर, भाऊ किनळेकर, स्नेहल पिंगुळकर, पशुसंवर्धन अधिकारी म्हापणकर, अंगणवाडी कर्मचारी, महिला बचतगट प्रमुख व सदस्य, ग्रा.पं. सदस्य व कर्मचारी, पर्यटव व्यावसायिक, मेढा व श्रीरामवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेबुडकर यांनी स्वच्छता मोहिम व स्वाक्षरी फलकाचे उद्घाटन केले.

मेढ़ा सरपंच अवधूत रेगे यानी शाल, पुष्पगुच्छ व बचत गटानी तयार केलेली गणेश मूर्ति देवून रविंद्र खेबुडकर यांचा सत्कार केला. नव वर्षाच्या पूर्वसंधेला बुधवारी सायंकाळी खेबुडकर यांनी मेढा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत गांवच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामपंचायतीने योग्यनियोजन करुन ग्रामस्थांच्या सहकार्याने गावचा पर्यटन दृष्टया विकास करावा शासनाकडून आपणास सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व ग्रा.पं. अधिकारी शरद शिंदे यांनी केले.