दोडामार्ग | सुहास देसाई : दोडामार्ग तालुक्यात विविध उपक्रमांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्ष लागवड, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच अनेक विवीध उपक्रम राबविले गेले त्या अनुषगानेआज साटेली भेडशीत मेगा ऑटोपॅडीक आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद लाभला होता या शिबिराचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली डॉ. जगदीश पाटील यांनी स्वागत केले तर प्रस्तावना गोपाळ गवस यांनी केली यावेळी पुणे येथील लोकमान्य हॉपिटल चे डॉक्टर सह सर्व टीम उपस्थित होते
या शिबिरात बोलताना शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी सर्व सामान्य जनतेसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करताना काही वेळा गैरसोय होते त्यावेळी आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते सहकार्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात जनतेला आरोग्य सुविधा चांगली मिळावी यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेत असून त्याचा लाभ ग्रामीण जनतेला मिळावा या उद्देशाने मेगा ऑथोपेडिक शिबिरात लाभ घ्यावा यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत असेही गणेशप्रासाद गवस यांनी सांगितले
या शिबिरासाठी डॉ.जगदीश पाटील डॉ. राणे डॉ. प्रसाद प्रसाद डॉ.अश्विन कुमार मांडवी उपजिल्हा संघटक गोपाळ गवस सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस विभाग प्रमुख रामदास मेस्त्री उपतालुका प्रमुखदादा देसाई उपजिल्हा महिला प्रमुख मनीषा गवस तालुका आघाडी प्रमुख राधिका गडेकर माजी सरपंच ज्ञानेश्वर शेट्ये पिकुळे सरपंच आपा गवस कोनाळ उपसंरपच रत्नकांत कर्पे आदी उपस्थित होते
या शिबिरासाठी परिसरातील शेकडो ग्रामस्थ आरोग्य तपासणी साठी उपस्थित होते यावेळी सर्वाची आरोग्य तपासणी करून त्यांना अल्पोहार देण्यात आला या कार्यक्रमासाठी साटेली भेडशी आरोग्य विभागाने विशेष परिश्रम घेतले यावेळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी परिसरातील सरपंच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते












