रस्ता सुरक्षा अभियान बाईक रॅलीचे मालवणात उत्स्फूर्त स्वागत

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या ‘पोलिस रेजिंग डे’ निमित्त ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत देवगड येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन झाल्यावर देवगड मालवण ते वेंगुर्ला बाईक रॅली आयोजित करण्यात आली. मालवण येथे या रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे,
नगराध्यक्षा ममता वराडकर, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, प्राध्यापक एम. आर. खोत, शिवसेना जिल्हा समन्वयक माजी नगराध्यक्षा महेश कांदळगांवकर, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, नगरसेवक दीपक पाटकर, सहदेव बापर्डेकर, नगरसेविका पुनम चव्हाण, मेघा सावंत, नीना मुंबरकर, शहर संघटक राजू बिडये, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर, सूर्यकांत फणसेकर, सीताराम लुडबे, शेखर गाड, अखिलेश शिंदे, जाबीर खान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभाग, लायन्स क्लब तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.