नातवंडांच्या हस्ते झालेल्या पाद्यपूजेने आजी आजोबा गेले भारावून

केक कापून वाढदिवस साजरा झाल्याने ज्येष्ठ नागरिक गहिवरले, वेरळ येथे पार पडला कार्यक्रम

संतोष कोत्रे
लांजा -: आपल्या नातवंडांच्या हस्ते झालेल्या पाद्यपूजेने आजी आजोबा सुखावून गेले.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. अनेकांनी हा सुखाचा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला देखील. निमित्त होते ते वेरळ पोलीस पाटील आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ नं. १ घ्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या देखण्या आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे
सध्याच्या फ्लॅट संस्कृतीत नातवंडे आणि आजी आजोबा यांचे नाते तुटत चालले आहे.‌वृध्द माणसे नातवंडांच्या प्रेमाला पारखी होत आहेत. म्हणूनच आजी आजोबा आणि नातवंडे यांचे नाते वृध्दींगत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याच कार्यक्रमात एकाच वेळी सुमारे १२५ ज्येष्ठ नागरिकांचा भव्य केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचा अशाप्रकारे केक कापून वाढदिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्यांच्यासाठी हा क्षण वेगळाच आनंद देऊन गेला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे खास करून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्याला जन्म दिलेल्या आई-वडिलांना व्यस्त कामामुळे मला भेटता येत नाही याची मनाला हुर हूर लागत होती. मात्र आज या कार्यक्रमाचे निमित्ताने
मला माझ्या या आई-वडिलांना भेटण्याचे आणि गप्पा मारण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे मी स्वतःला खरोखरच भाग्यशाली समजतो असे भावोद्गार त्यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले ,उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग ,विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे ,वेरूळ सरपंच सुवर्णा जाधव आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांचे नातवंडांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले.त्यानंतर एकाच वेळी सुमारे १२५ ज्येष्ठ नागरिकांचा भव्य केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी बोलताना श्री बगाटे म्हणाले की आपण हा उपक्रम जोरदार उत्साहात करून जेष्ठ नागरिकांची सुसंवाद साधला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून आजी आजोबा आणि नातवंडे यांच्यातील दुरावा कमी करण्याचा या मिशनद्वारे प्रयत्न आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी लांजा तालुक्यात १६९२ ज्येष्ठ नागरिकांचा एकाच वेळी सन्मान सोहळा विविध ठिकाणी पार पाडून आपल्या कामातील चुणूक दाखवली आहे असे गौरव दगार काढले.
कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी तहसीलदार प्रियांका ढोले यांनी मार्गदर्शन केले . यावेळी पाच ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचा तर वर्षाच्या पहिल्या दिवशी जेवढ्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार शाल श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाला पत्रकार आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र साळवी,
माजी पंचायत समिती सभापती दीपाली साळवी , मुख्याध्यापक संदीप कदम, पोलीस पाटील यदुनाथ पंडित, महेश गजबार , सना मुल्ला व ग्रामस्थ, विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.