तिलारी धरण पूर्णक्षमतेने भरले!

 

 सांडव्यातून पाणी नदीला सोडले 

नदी काठच्या गावांना सर्तकतेचा ईशारा! 

जिल्हाधिकारी पोलिस अधिक्षक याचे कडून तिलारीला भेट 

दोडामार्ग l सुहास देसाई :तालुक्यातील प्रमुख असलेल्या तिलारी प्रकल्पाच्या मुख्य धरणात पाणी साठा पूर्ण क्षमतेने भरले असून पुच्छ कालव्याच्या सांडव्यातून पाणी तिलारी नदीच्या मुख्ख प्रवाहात दरवाजे उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाह पाण्याचा विसर्ग होत आहे तरी नदी काठच्यां ग्रामस्थांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे परीसरात नदी नाले काठ च्यां लोकांना जलसंपदा विभागाने वर्तवली आहे तर तालुक्यांत धोक्याची सूचना दिली आहे

ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहत आहे तिलारी नदीच्या पात्रात आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी चार दरवाज्यातून ८.४१४ क्यूसेस विसर्ग सुरु असून हे पाणी दरवाजे उघडल्याने पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे नदी काठच्या पात्रात वाढ होऊन गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाणी वाढणार असल्याने सावधानतेचा इशारा

दंवडी गावावर देण्यात आलीआहे

दरम्यान

 

आज तिलारी प्रकल्पाच्या मुख्य धरणात पाणीसाठा वाढला असल्याने जिल्हाधिकारी पोलिस अधिक्षक यांनी तिलारी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांचे कडून आढावा घेतला व योग्य त्या सूचना केल्या असल्याचे समजते

 

तिलारी मुख्य धरणाची आताची (दि 22.7.2023 सकाळी 6.00) पाणी पातळी 106.40मी इतकी आहे. धरणाची सांडवा पातळी 106.70मी इतकी आहे. म्हणजे अजुन सांडव्यावरून पाणी वाहुन जाणेसाठी फक्त 0.30मी इतकी पाणी पातळी वाढणे आवश्यक होते. पाणलोट क्षेत्रातील पाऊस पहाता येत्या 2 ते 3 तासात कधीही सांडव्यातून नदीमध्ये विसर्ग सुरु हाऊ शकतो. याबाबत कालच नदीकाठच्या सर्व गावाना सतर्क राहन्याबदद्ल सुचित करण्यात आले आहे. तसेच सर्व संबंधीत गावांमध्ये या कार्यालया मार्फत काल रात्री सायरन वाजवून इशाराही देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा व तालुका प्रशासन आणी जिल्हा आपत्ति व्यवस्थापन कक्ष यांच्याशी सतत संपर्कात राहुन योग्य ती कार्यवाही करणेत येत आहे. धरणातून विसर्ग सुरु होताच विसर्गाचे प्रमाण किती cumecs आहे हे वेळोवेळी सर्व संबंधितांना कळवणेत येईल.

काल समाजमाध्यमामध्ये

तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाला झाल्याच्या बातम्या व वीडियो दाखवन्यात येत होता. प्रत्यक्ष्यात तेरवनमेढे उन्नेयी बंधार्यातून फक्त 98 क्युमेक इतकाच विसर्ग सुरु होता. परंतू त्यामूळे काल काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत या कार्यलायामार्फत गैरसमज दुर करण्याचे शक्यतो सर्व प्रयत्न करुन योग्य वस्तुस्थिती सर्व संबंधित लोकांपर्यंत सांगण्यात आली.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये व अनावश्यक घाबरुन जाऊ नये असे आवाहन करणेत येत आहे वि बा जाधव कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग

सावंतवाडीयांनी केले आहे