नामवंत गायक अवधूत गुप्ते यांची प्रतिक्रिया
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला दिली सदिच्छा भेट
*चिपळूण (संतोष सावर्डेकर):-* जी लोकं म्हणतात मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही. ‘कोकणी आदमी के बस का काम नही है’! त्या सगळ्यांनी तुमच्या डोळ्यात अंजन घालतील, असा हा छान प्रकल्प सुरू झाला आहे, तो म्हणजे वाशिष्टी डेअरी प्रकल्प होय. वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प पाहून मी भारावून गेलो आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया मराठमोळा नामवंत गायक अवधूत गुप्ते यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिल्यानंतर व्यक्त केली. इतकेच नव्हे तर वाशिष्ठी डेअरीचे प्रत्येक उत्पादन दर्जेदार आणि अप्रतिम आहेत. चिपळूणला या, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला भेट द्या, या प्रकल्पाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद घ्या, असे आवाहन देखील गुप्ते यांनी यावेळी केले.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल झाली. गुरुवारी रात्री मराठमोळा नामवंत गायक अवधूत गुप्ते यांच्या गीतांचा उत्साहीपूर्ण वातावरणात कार्यक्रम झाला. यानंतर शुक्रवारी गुप्ते यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या निवासस्थानी साई मंदिराला भेट देऊन साईंचे दर्शन घेतले. पुढे पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, कु. स्वामिनी यादव यांनी अवधूत गुप्ते आणि प्रसिद्ध समालोचक अभिजीत गोडबोले यांचे स्वागत केले.
गायक अवधूत गुप्ते यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी प्रशांत यादव यांनी प्रकल्पाविषयी गुप्ते यांना माहिती दिली. यानंतर गुप्ते संवाद साधताना म्हणाले की, वाशिष्ठी कृषी महोत्सवादरम्यान प्रशांत यादव यांच्यावर असलेले जनतेचे प्रेम पाहून आपण थक्क झालो आहोत. आता तर वाशिष्ठी डेअरी प्रकल्प पाहिल्यानंतर आणखी आपण भारावून गेलो आहे. जी लोकं म्हणतात, मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही. ‘कोकणी आदमी के बस का काम नही है’! त्या सगळ्यांनी तुमच्या डोळ्यात अंजन घालतील, असा हा छान प्रकल्प सुरू झाला आहे. तो म्हणजे वाशिष्ठी डेअरी प्रकल्प होय. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्तम दर्जाचे आहेत. इतकेच नव्हे तर कोकणी मराठी माणसाची प्रगती पाहून भारावून गेलो आहे. चिपळूणला या, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला भेट द्या. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकत घ्यायचे असतील तर वाशिष्ठी डेअरी असा बोर्ड दिसला, बिनधास्त खरेदी करा, असे आवाहन अवधूत गुप्ते यांनी यावेळी केले. वाशिष्ठी डेअरीचे प्रत्येक उत्पादन दर्जेदार आणि अप्रतिम आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात वाशिष्ठी डेअरी नावारूपास येईल, असा विश्वास गुप्ते यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी वाशिष्ठी डेअरीचे संचालक अविनाश गुडेकर, वाशिष्ठी डेअरीचे जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, मॅनेजर प्रदीप मगदूम, मार्केटिंग मॅनेजर तानाजी निंबाळकर, अकाउंट मॅनेजर विजय वाजे, सामाजिक कार्यकर्ते रमणशेठ डांगे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल पवार यांच्यासह वाशिष्ठी डेअरीचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.











