जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील ६ जि.प. मतदार संघातील व १२ पं.स मतदार संघातील इच्छुकांसाठी शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढविण्यासाठी पक्षाचे इच्छुक उमेदवारी फॉर्म पक्ष कार्यालयात उपलब्ध आहेत.
हे फॉर्म १६ जानेवारी ते १७ जानेवारी २०२६ पर्यंत मिळणार आहेत. फॉर्म घेण्यासाठीची वेळ सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत व संध्या ३ ते ६ पर्यंत असणार आहे.
स्थळ शिवसेना मध्यवर्ती शाखा मालवण, मामा वरेरकर नाट्यगृहा समोर, कोर्णाक हॉटेल शेजारी. ज्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे त्यांनी इच्छुक उमेदवारी फॉर्म घेणे आवश्यक आहेत. विहीत वेळेत पुन्हा शिवसेना शाखेत देण बंधनकारक आहे. असे आवाहन जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.











