रामगडचा सौरभ तारी बनला अग्निवीर!

मसुरे | झुंजार पेडणेकर : रामगड गावचा सुपुत्र सौरभ सुनिल तारी यांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. सौरभ याने प्राथमिक शिक्षण केंद्र शाळा रामगड नं १मधून पुर्ण केले तर माध्यमिक शिक्षण प्रगत विद्यामंदिर रामगड येथे पुर्ण करून उच्च माध्यमिक शिक्षण एस. एम. ज्युनियर कॉलेज कणकवली मधून पूर्ण केले. त्याला लक्ष करिअर अकॅडमी खिंडीव्हरवडे तालुका राधानगरी येथील श्री लक्ष्मीकांत हंडे व श्री हृदयनाथ हंडे यांचे मार्गदर्शनाखाली लाभले. यश संपादन करताना आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे सौरभ याने सांगितले. त्याचे वडील सुनिल वासुदेव तारी हे कणकवली एसटी आगारात चालक या पदावर कार्यरत आहेत. एक भाऊ व आई वडील असा त्याचा परिवार आहे. सौरभ याचे रामगड सरपंच शुभम मठकर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.