ओटवणे (प्रतिनिधी) ओटवणे कपईवाडी गणेश मंदिर येथे गुरुवारी 22 जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्साहात संपन्न होत आहे या निमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून मंदिर सजावट तसेच विद्युत रोशणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे.या निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १०.०० ते १०.३० श्री गणेशपूजन,१०.३० ते १२.३० – श्री सत्यविनायक महापुजा,१२.३० ते १.०० – श्री गणेश अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती,दुपारी १.३० ते ३.३० महाप्रसाद.
,सायं. ६.०० ते ७.०० स्थानिक ग्रामस्थांचे भजन,सायं. ७.०० ते ७.४५ स्थानिक बालकलाकारांचे गुणदर्शन पर मनोरंजनाचे कार्यक्रम,रात्रौ.७.४५ ते ८.१५ – महिलांचा फुगडीचा कार्यक्रम,रात्रौ ८.१५ ते ८.३० -दोन पात्री विनोदी नाटिका,रात्रौ ८.३० वाजता……
श्री अष्टविनायक पारंपारीक दशावतार मंडळ -नीरवडे सावंतवाडी यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग माहेर वासिनी आई भवानी हा होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश मंदिर व्यवस्थापन समिती व श्री गणेश कला व क्रीडा मंडळ ओटवणे कापई वाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.












