रिपब्लिकन सेनेकडून (आनंदराज आंबेडकर) दोन उमेदवारी अर्ज दाखल

अनिरुद्ध कांबळे यांनी गवाणे जि.प.गटासाठी तर वंदना कदम वेरवली पं.स.गणासाठी उमेदवारी

लांजा (प्रतिनिधी): रिपब्लिकन सेनेच्या वतीने (आनंदराज आंबेडकर) आज बुधवारी अनिरुद्ध कांबळे व वंदना कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले .
शिवसेना भाजपा महायुतीत आपल्याला तिकीट मिळावे म्हणून रिपब्लिकन सेनेकडून अनिरुद्ध कांबळे यांनी इच्छुकता व्यक्त केली होती.‌ मात्र महायुतीच्या जागा वाटपात अखेर स्थान न मिळाल्याने रिपब्लिकन सेनेच्या वतीने अनिरुद्ध कांबळे यांनी
आज उमेदवारी दाखल केला.‌ गवाणे जिल्हा परिषद गटासाठी अनिरुद्ध कांबळे यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला. तसेच रिपब्लिकन सेनेच्या वतीने वेरवली पंचायत समिती गणातून वंदना कदम यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला.
या उमेदवारी दाखल करण्या प्रसंगी अनिरुद्ध कांबळे यांच्यासोबत संदेश कांबळे, नंदा कांबळे, वैशाली कांबळे, कल्याणी कांबळे, जितेंद्र कांबळे, अनमोल कांबळे, अनामिका कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत कदम, उपाध्यक्ष राजेश पवार ,सल्लागार हनुमंत कदम, रमाकांत कांबळे, नामदेव जाधव गुरदास कांबळे आदी उपस्थित होते.