मुंबई : मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचे आज मुंबईत निधन झाले. गेले अनेक दिवस ते वार्ध्यक्याशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. वयाच्या विशीत सुरु झालेली त्यांची अभिनय कारकीर्द अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत झोकात सुरु होती. अखेरपर्यंत कलाविश्वाशी विशेषतः मराठी रंगभूमीशी प्रामाणिक राहिलेल्या अण्णांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.











