वेंगुर्ले : प्रतिनिधी
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २३ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम, केरळ येथुन “प्रधानमंत्री स्वनिधी योजने” अंतर्गत देशभरात एक लाख कर्जाचे वितरण तसेच क्रेडिट कार्डाचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी सहभाग घेतला.
येथील स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्थानिक पथविक्रेत्यांचे अभिसरण करुन क्रेडिट कार्ड अर्ज बॅकांकडे पाठविण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, नगरसेवीका अँड. सुषमा प्रभुखानोलकर, नगरसेवक सुधीर पालयेकर, नगरसेवक विनय नेरुरकर, नगरसेवक सदानंद गिरप, नगरसेवीका शितल आंगचेकर , नगरसेविका गौरी माइणकर , नगरसेविका काजल कुबल , नगरसेवक सचिन शेटये , नगरसेविका रिया केरकर , नगरसेविका लिना म्हापणकर , नगरसेवीका आकांक्षा परब , प्रशासकीय अधिकारी अभिजीत पाटील , गणेश कांबळे , संगीता कुबल , ज्ञानेश्वर जाधव तसेच नगरपरिषद कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.











