खेळ पैठणीचा स्पर्धेची विशाखा चिंदरकर विजेती 

बांदा श्रीपिंपळेश्वर गणपती मंदिर मित्रमंडळाचे आयोजन 

बांदा : प्रतिनिधी

बांदा येथील पिंपळेश्वर गणपती मंदिर मित्रमंडळ आयोजित संगीत खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सौ. विशाखा चिंदरकर विजेत्या ठरल्या. सौ. गौतमी गोवेकर उप विजेत्या तर तनुश्री परब तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. सर्व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पैठणी व रोख पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्तर रात्रीपर्यंत चाललेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन डिंगणे माजी सरपंच नितीन सावंत, महिला भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच दीपक सावंत, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सुरेश चिंदरकर. मंडळाचे अध्यक्ष सुनील माजगावकर, उपाध्यक्ष सचिन वीर, रुपेश माजगावकर, दादा साळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 

स्पर्धेची शेवटची फेरी अतिशय चुरशीची झाली. यामध्ये तीन स्पर्धक महिलांचे समान गुण झाल्याने शेवटी पुन्हा एक अंतिम फेरी घेण्यात आली. या चुरशीच्या फेरीमध्ये सौ. विशाखा चिंदरकर यांनी बाजी मारत संगीत खेळ पैठणीच्या खेळामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

स्पर्धेत नीलम पटेल, सावली कामत व सानवी बुटे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. शुभम धुरी यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमात आणखीन रंगत आणली. स्पर्धेत सुमारे ६० महिलांनी सहभाग घेतला.

 

कार्यक्रमाचे बक्षीस वितरण दिगंबर गायतोंडे, समीर धारगळकर, गजानन गायतोंडे, सचिन वीर, अनिल माजगावकर, रुपेश माजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश परब तर आभार गजानन गायतोंडे यांनी मानले.