खेड (प्रतिनिधी) – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या अधिकृत संगीत परीक्षेमध्ये खेड येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व ३२ विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होत शाळेस शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील स्तरावरील परीक्षेसाठी पात्र ठरण्याचा मानही मिळविला आहे.
दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या प्रारंभिक गायन परीक्षेसाठी एकूण १९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये कु. अव्दैत मळणगांवकर, कु. मीरा खेडेकर, कु. मृण्मयी दामले, कु. नव्या देवरुखकर, कु. चैत्राली क्षीरसागर, कु. निष्ठा वाडकर, कु. मेदीनी पेंडखळकर, कु. आराध्या आंबेडे, कु. श्रीनिती चव्हाण, कु. तृष्णा चिखले, कु. अंतरा शेठ, कु. विराज गावडे, कु. स्वरा कदम, कु. श्रेयसी इब्रामपूरकर, कु. किंजल महाजन, कु. अनया पाटील, कु. जिज्ञा बामणे, कु. भक्ती जाधव आणि कु. नैतिका जैजू या विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गायन सादरीकरण करत परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली.
तसेच दि. २० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या तबला परीक्षेसाठी १२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये कु. कार्तिक चव्हाण, कु. सार्थक काते, कु. ऋग्वेद अढावडे, कु. सोहम निगडेकर, कु. पलाश वर्पे, कु. लावण्य दरेकर, कु. आयुष मोरे, कु. वरद भागणे, कु. आराध्य मांडवकर, कु. अधिराज मांडवकर, कु. अर्णव दामले आणि कु. दुर्वांक कोकाटे यांनी यश संपादन केले. याचबरोबर प्रवेशिका प्रथम परीक्षेसाठी कु. काव्या कान्हेरे हिनेही उत्तम कामगिरी करत परीक्षा उत्तीर्ण केली.
या सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक श्री. अभिषेक जोशी, सौ. कर्णिका निगडेकर तसेच तबला शिक्षक श्री. नयन किरडवकर यांनी सातत्यपूर्ण आणि मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या परिश्रमांचे यशस्वी फलित या निकालातून स्पष्टपणे दिसून आले.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.












