राजापुरात जवाहर चौकात नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते ध्वजारोहण

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर नगर परिषद लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील जवाहर चौक येथे सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला.
यानंतर जवाहर चौकातील नन्हे साहेब पुलाच्या सुशोभीकरण निमित्ताने संविधानाच्या प्रास्ताविक पाटीचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय संविधानातील मूल्ये, लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने ही पाटी उभारण्यात आली आहे.
तसेच शहरातील वरचीपेठ येथे नियोजित प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या देखरेखीखाली उत्साहात पार पडला. याचप्रमाणे रानतळे येथील अमृतसरोवर परिसरातही ध्वजारोहण करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांना नागरिक, विद्यार्थी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.