रत्नागिरी ः प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांचा ई-गवर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाने “सर्वोत्तम पोलिस अधिक्षक कार्यालय” या श्रेणीत महाराष्ट्र राज्यातील 34 पोलिस अधिक्षक कार्यालयांमध्ये 5 वा.क्रमांक प्राप्त केला आहे. या सामान्यीकृत व प्रमाणित मुल्यमापनात एकूण 200 गुणांपैकी 144.25 गुण पोलिस अधिक्षक कार्यालयाने मिळवले आहेत.
महाराष्ट्र शासनाचे शासकिय कामकाज अधिक पारदर्शक,कार्यक्षम व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाने उल्लेखनिय कामगिरी पार पाडत महाराष्ट्रातील 34 पोलिस अधिक्षक कार्यालयांमध्ये सर्वोत्कृष्ट पोलिस अधिक्षक या वर्गवारीत 5 वा.क्रमांक प्राप्त्ा केला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकिय कार्यालयांचे मूल्यमापन क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेमार्फत करण्यात आले. या मुल्यमापनाच्या आधारे विविध श्रेणीतील उत्कृष्ट शासकिय कार्यालयांची निवड करण्यात आली आहे. त्याचे निकाला दि.26 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाव्दारे जाहिर करण्यात आले.
या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सूधारणा कार्यक्रमांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे सात महत्वाच्या निकषांवर शासकिय कार्यालयांचे मुल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये कार्यालयाची अधिकृत वेबसाईट,‘आपले सरकार’प्रणालीचा वापर,ई-ऑफीस प्रणाली,कार्यालयीन डॅशबोर्ड,व्हॉटसॲप चॅटबॉटचा वापर,शासकिय कामकाजात एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञाचा वापर व जीआयएस तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर याचा समावेश आहे. पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सर्व निकषांची जिल्हा पोलिस दलात प्रभावी अंमलबजावणी करुन वापर करण्यात येत आहे. या यशामध्ये योगदान देणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी अभिनंतदन केले आहे. तसेच भविष्यातही ई-गव्हर्नन्सच्या माध्यातून नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प रत्नागिरी पोलिस दलामार्फत करण्यात आला आहे.
Home महत्वाच्या बातम्या ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलीस दलाचा राज्यात डंका; ‘सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कार्यालय’ श्रेणीत पाचवा...











