मार्गाचीतड येथे श्रमदानाने बांधला बंधारा

झुंजार पेडणेकर रमाई नदीवरील मार्गाचीतड येथील लयवड बंधारा ग्रामस्थांनी लोखंडी प्लेट च्या सहाय्याने बांधल्याने या भागातील विहिरीची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शेकडो एकर शेती ओलिताखाली येणार आहे. यावेळी पोलीस पाटील साइप्रसाद बागवे, सत्यविजय भोगले, मानस गोरे, मंगेश हडकर, बापू चव्हाण, संतोष परब, यज्ञेश गुरव, सचिन गोलतकर, गोपाळ बागवे, दिलीप परब, बबली बागवे, योगेश मसुरकर, अमित बागवे, अविनाश परब आदी ग्रामस्थांनी श्रमदान केले.