मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुक्यातील मुणगे लब्देवाडी सडा येथे श्री गोपाळकृष्ण गोठण गवळदेव मंडळाचा त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम ३१ जानेवारी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त मुणगे लब्देवाडी, आडवळवाडी, आपईवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२
वा. आरती, तीर्थप्रसाद, रात्री ७.३० वा. स्थानिक संगीत भजने, १० वा. जयघोष हरिनामाचा या कार्यक्रमातंर्गत ओम श्री पावणाई कला, क्रीडा दिंडी भजन मंडळ-दाभोळे- मधलीवाडी तसेच आई भगवती कलादिंडी भजन मंडळ तोरसोळे यांचे दिंडी भजन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन गोपाळकृष्ण गोठण गवळदेव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे











