
मंडणगड | प्रतिनिधी– विकासाचे मार्गावर पुढे जाण्यासाठी सत्तेच्या मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नाही या वास्तवाची जाण असलेल्या मतदार संघातील मतदारांचे बळावर भारतीय जनता पार्टी मतदार संघातील परिवर्तनास सज्ज झालेली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी पार्टीच्या भिंगळोली येथील कार्यालयात 1 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले यावेळी प्रभारी तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, रत्ना मोहीते, स्मिता थोरे, सचिन थोरे, गिरीश जोशी, वैभव नारकर,महेश कंचावडे, दत्ता महाडीक, आकाश नाविलकर, विश्वदास लोखंडे, विजय शिंदे यांच्यासह पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना श्री दळवी पुढे म्हणाले की मतदार संघात सध्या दहशतीचे वातावरण आहे मोकळे वातावरण नाही व कोकणचा बिहार होवू न देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे मतदार संघाचा पुर्ण दौरा केला आहे. मतदार संघात आम्ही उभे केलेले सर्व उमदेवार यशस्वी होतील असा विश्वास करताना मतदार संघाचे प्रश्न, राज्यात विकासाचा झंझावत निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अग्रक्रमाचे प्रश्न आहेत व मतदारांनी विश्वास दाखवल्यास त्यांची पोहच पावती मतदार संघात अद्याप न झालेल्या विकास कामांचे परिपुर्तीच्या रुपाने करुन दाखवू असा विश्वास यावेळी व्यक्त केला. तालुक्याच्या औद्योगीक वसाहतीचा प्रश्न, म्हाप्रळ आंबेत खाडीवरुन नवीन पुल, व लोकसभा मतदान क्षेत्राचे धर्तीवर नवीन जिल्ह्यासाठी पार्टीचे माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत व स्थानीक पातळीवर रोजगार निर्मीतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगीतले. याचबरोबर पत्रकारांना विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली व जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.












