राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता राजापूर हायस्कूल कलामंदिर सभागृहात कै. द. ज. सरदेशपांडे स्मृतिदिन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून राजापूर हायस्कुलच्या माजी विद्यार्थीनी आणि सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे येथील प्रा. डॉ. लीना जावकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारी मंडळाचे कार्यवाह जगदीश पवार यांनी केले आहे.











