आचरा विभागातील महायुतीचे तीनहीउमेदवार बहुमताने निवडून येण्याचा निर्माण झाला विश्वास

आचरा–अर्जुन बापर्डेकर : शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुती चा विजय असो येवून येवून येणार कोण महायुती शिवाय आहे कोण अशा घोषणांनी आचरा बाजारपेठ दुमदुमून गेली होती.
आचरा बाजारपेठेत काढण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार रॅली ला शिवसेना भाजप कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.मच्छीमार्केट पासून निघालेली प्रचार रॅली आचरा तिठयावरुन शिवसेना प्रचार कार्यालया पर्यंत काढण्यात आली. या प्रचार रॅली मध्ये जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी, आचरा पंचायत समिती उमेदवार गणेश तोंडवळकर, चिंदर पंचायत समिती उमेदवार दिपक सुर्वे यांसह शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे, आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, जेरोन फर्नांडिस, अभय भोसले, भाऊ हडकर, जयप्रकाश परुळेकर,रुपेश पाटकर, संतोष मिराशी,चावल मुजावर, पंकज आचरेकर, विजय कदम,ज्ञानदेव पाटील, अशोक बागवे,शशिकांत नाटेकर, उदय घाडी,संजय केळूस्कर,दिलीप कावले,मंदार सांबारी,, मांगिरीष सांबारी,सचिन हडकर,रुपेश हडकर,किशोर आचरेकर यांसह बहुसंख्येने आचरा चिंदर, त्रिंबक,वायंगणी, तोंडवळी,बांदिवडे चे ग्रामस्थ सहभागी झाले होते. या प्रचार रॅली नंतर बोलताना जिल्हा परिषद उमेदवार वर्षा सांबारी यांनी मतदार राजाचा महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसाच उत्साह आणि प्रतिसाद मतदान पेटीतून देवून आम्हाला प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.










