पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत टेंबवली कालवी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसला धक्का

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत टेंबवली ग्रामपंचायतचे सदस्य व काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
टेंबवली ग्रामपंचायतचे ग्राम सदस्य शेखर धुरी, माजी ग्रामपंचायत सदस्य बबन घाडी यांच्यासह तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षात नेतृत्वाचा अभाव निर्माण झाला असून, पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सुरू केलेल्या विकासकामांच्या धडाक्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपात प्रवेश करत असल्याचे मत यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
टेंबवली ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांसह कालवी येथील काँग्रेस कार्यकर्ते निकेश गुरव, सुभाष शिंदे, मंगेश मांडवकर, तुषार फाळके, सुरज मांडवकर, अनंत शिंदे, संजय घाडी, रोहन बाणे, संतोष बाणे, सागर शिंदे, रत्नदीप शिंदे, स्वप्निल घाडी, प्रकाश बाणे, सचिन गुरव, सदानंद मांडवकर, भालचंद्र शिंदे यांच्यासह अनेक जणांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनुभवणे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, तालुका सचिव योगेश चांदोसकर, दयानंद पाटील, सावी लोके, संतोष किंजवडेकर, बंड्या गोगटे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.