दोडामार्ग तालुक्यात ‘महायुती’चा झंझावात; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर वर्चस्व

दोडामार्ग तालुक्यात ‘महायुती’चा झंझावात; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर वर्चस्व

 

दोडामार्ग: सुहास देसाई

 

दोडामार्ग तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने (भाजपा आणि शिवसेना-शिंदे गट) ऐतिहासिक यश संपादन केले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३ आणि पंचायत समितीच्या ६ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि भव्य मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला.

जिल्हा परिषद निवडणूक निकाल: महायुतीची निर्भेळ आघाडी

जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागांवर महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

महायुतीचे उमेदवार विज कार्यकर्त्या जल्लोष के मिरवणुकीसह आतषबाजी केली यावेळी

जिल्हा परिषद व पंचायत समिती विजयी उमेदवार व मते

जिल्हा परिषद

मणेरी

*१) साक्षी तळवडेकर (शिंदेसेना) ३४५५ (विजयी )*

२)ललिता ताटे (उद्धवसेना) १४०८

३) सुनिता भिसे (अपक्ष) २३९०

मताधिक्य – १०६५

 

पंचायत समिती

कोलझर

*१) गणेशप्रसाद गवस (शिंदे सेना) – बिनविरोध

पंचायत समिती मणेरी

*१) सोनिया कुबल (भाजपा) १४८८ (विजयी)*

२) दीपक जाधव (बहुजन समाज पार्टी) ९४

३)प्रीती धुरी (उद्धवसेना) १२७१

४) संजय तुकाराम देसाई (अपक्ष) १२१

५)प्रवीण पांडुरंग गवस (अपक्ष) ५६५

६)अनिरुद्ध अविनाश फाटक (अपक्ष) २५८

मताधिक्य – २१७

 

*जिल्हा परिषद माटणे*

*१) दिपक उर्फ रामा गवस (भाजपा) ३७८८ विजयी*

२)राजेंद्र म्हापसेकर (अपक्ष) २०९१

३)बाबुराव दत्ताराम धुरी  (उद्धवसेना)१३९०

४)प्रकाश कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)) १२३

५)लक्ष्मण गवस (अपक्ष) ३४४

मताधिक्य – १६९७

 

 

पंचायत समिती

झरेबांबर

 

*१)स्नेहा गवस (शिंदेसेना) २५५४ विजयी*

२)विनिता घाडी (उद्धवसेना) ७५५

३)वृषाली गवस (अपक्ष) १२६३

मताधिक्य – १२९१

 

माटणे पंचायत समिती

 

*१) पार्वती गवस (भाजपा) १५५९ विजयी*

२)प्रिया नाईक (उद्धवसेना) ८२६

३)सुप्रिया नाईक (अपक्ष) ५८४

मताधिक्य – ७३३

 

जिल्हा परिषद

साटेली – भेडशी

 

*१)श्वेता धर्णे (भाजपा) ५३१२ विजयी*

२)सुनंदा धर्णे  (उद्धवसेना) १८७३

मताधिक्य -३४३९

 

पंचायत समिती

कोनाळ

*१) सायली निंबाळकर (शिंदे सेना) २०२१ विजयी*

२)सोनाली गवस ( उद्धवसेना) ४१८

३)साक्षी देसाई (अपक्ष) १०७१

मताधिक्य – ९५०

 

साटेली भेडशी पंचायत समिती –

*१) संजय सातार्डेकर (भाजपा) १७८४ विजयी*

२)सिद्धेश कासार (उद्धवसेना) ९१२

३)संदीप नाईक (राष्ट्रीय काँग्रेस) १७०

४)गंगाराम कोळेकर (अपक्ष) ९८७

मताधिक्य – ७९७


दोडामार्ग तालुक्यात महायुतीचा झंझावात

सर्व उमेदवार विजयी

भाजपा व शिंदे सेना प्रत्येकी तीन पंचायत समिती 

जिल्हा परिषद दोन भाजपा तर एक शिंदे सेना विजयी 

दोडामार्ग : सुहास देसाई / प्रवीण परब

दोडामार्ग तालुक्यात जि.प. व पं.स. निकाल जाहीर झाला असून भाजपा शिंदे शिवसेना उमेदवार विजयी झाले आहे . यात कोलझर पं.स. शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवडून झाली होती.

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक निकाल ऐकण्यासाठी आणि तालुक्याच्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी मोठी गर्दी उसळली. काहींनी पक्षाशी बंडखोरी करत निवडणुकीला सामोरे गेले त्यांना धूळ चारली आहे उबाठा सेना जिल्हा प्रमुख बाबुराब धुरी यांना पराभव पत्करावा लागला आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रीती धुरी मणेरी मधून पराभूत झाल्या आहेत. त्यांना नवख्या उमेदवार सोनिया कुबल यांनी पराभूत केले आहे.

 

 

 

जिल्हा परिषद

मणेरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) यात सुनिता कमलाकर भिसे (अपक्ष), ललिता लक्ष्मण ताटे (ठाकरे शिवसेना), साक्षी विशांत तळवडेकर (शिंदे शिवसेना) ३४५५मते यांच्या तिहेरी लढत झाली होती. यात शिंदे शिवसेनेच्या साक्षी तळवणेकर विजयी झाल्या आहेत.

 

साटेली भेडशी (सर्वसाधारण महिला) या गटातून सुनंदा सुधाकर धर्णे (ठाकरे शिवसेना) व श्वेता सूर्यकांत धर्णे (भाजपा) यांच्या दुहेरी लढत झाली. यात श्वेता सूर्यकांत धर्णे विजयी झाल्या आहेत

 

माटणे (सर्वसाधारण) या गटातून बाबुराव दत्ताराम धुरी (ठाकरे शिवसेना), लक्ष्मण दशरथ गवस (अपक्ष), प्रकाश लक्ष्मण कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)), रामा दशरथ गवस (भाजपा) व राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर (अपक्ष) यांच्यात लढत झाली. यात भाजपा तालुकाध्यक्ष दिपक गवस १७०० मतांनी विजयी झाले आहेत.

 

पंचायत समिती

मणेरी (सर्वसाधारण) या गणातून दीपक बुधाजी जाधव (बहुजन समाज पार्टी), प्रीती बाबुराव धुरी (ठाकरे शिवसेना), संजय तुकाराम देसाई (अपक्ष), प्रवीण पांडुरंग गवस (अपक्ष), अनिरुद्ध अविनाश फाटक (अपक्ष) व सोनिया विश्राम कुबल -भाजपा यांच्यात लढत झाली. यात सोनिया कुबल (भाजपा) विजयी झाले आहे

 

कोनाळ (सर्वसाधारण महिला) सोनाली सुनील गवस (ठाकरे शिवसेना), साक्षी संदीप देसाई (अपक्ष) व सायली स्वप्नील निंबाळकर (शिंदे शिवसेना) यांच्यात तिहेरी लढत झाली. यात शिंदे शिवसेनेच्या सायली निंबाळकर विजयी झाल्यात.

 

साटेली भेडशी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) या गणातून गंगाराम जानू कोळेकर (अपक्ष), सिद्धेश गुरुनाथ कासार (ठाकरे शिवसेना), संदीप मोगरा नाईक (राष्ट्रीय काँग्रेस) व संजय पांडुरंग सातार्डेकर (भाजपा) यांच्यात लढत झाली. यात भाजपचे संजय सातार्डेकर विजयी झालेत.

 

झरेबांबर पंचायत समिती

नेहा गवस शिंदे (शिवसेना)

विनिता विष्णू घाडी (ठाकरे शिवसेना) व वृषाली प्रकाश गवस (अपक्ष) यांच्यात तिहेरी‌ लढत झाली. यात शिवसेनेच्या नेहा गवस विजयी झाल्या आहेत.

 

माटणे (सर्वसाधारण महिला) या गणातून प्रिया तुषार नाईक (ठाकरे शिवसेना), पार्वती महादेव गवस (भाजपा), सुप्रिया शैलेश नाईक (अपक्ष) यांच्यात तिहेरी‌ लढत होणार आहे. यात पार्वती गवस ह्या विजयी झाल्यात.

 

कोलझर (सर्वसाधारण) या गणातून युतीचे उमेदवार तथा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद शंकर गवस यांची बिनविरोध निवड झाली.


दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद मणेरी मतदार संघ मोजणी सुरू, टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण

 

दोडामार्ग l प्रतिनिधी :तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल जाहीर करण्यात येणार असून मतमोजणी कक्षात सर्व उमेदवार प्रतिनिधी उपस्थित असून निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर यांच्या मार्गदर्शना खाली मोजणीस सुरुवात झालीआहे

 

मतमोजणी कक्षा बाहेर मतदार कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे

*साटेली भेडशी जिल्हा परिषद*

 

1) श्वेता धरणे भाजपा:-१६

 

2) सुनंदा धरणे उबाठा:-२०

नोटा ४

*माटणे जिल्हा परिषद*

BJP 1) रामा ( दीपक ) गवस :-१०

अपक्ष 2) राजेंद्र म्हापसेकर :-३

उबाठा 3) बाबूराव धुरी :- १६

अपक्ष 4) लक्ष्मण गवस :-०

५) प्रकाश कांबळे ०

नोटा १

*मणेरी जिल्हा परिषद*

 

सेना 1) साक्षी तळवडेकर :-१०

उबाठा 2) ललिता ताटे :-०८

अपक्ष 3) सुनीता भिसे :-९

नोटा १

*माटणे पंचायत समिती*

 

BJP1) पार्वती गवस :-१

उबाठा 2)प्रिया नाईक :-६

अपक्ष 3) सुप्रिया नाईक :-०

नोटा ०

*झरेबांबर पंचायत समिती*

 

सेना 1) स्नेहा गवस :-१२

उबाठा 2) विनिता घाडी :- ६

अपक्ष 3) वृषाली गवस :-४

नोटा १

*साटेली भेडशी पंचायत समिती*

 

उबाठा 1) सिद्धेश कासार :-७

अपक्ष 2) संदीप नाईक:-०

BJP 3) संजय सातार्डेकर :-१०

अपक्ष 4) गंगाराम कोळेकर:-२

नोटा १

*साटेली भेडशी पंचायत समिती*

 

उबाठा 1) सिद्धेश कासार :-७

अपक्ष 2) संदीप नाईक:-०

BJP 3) संजय सातार्डेकर :-१०

अपक्ष 4) गंगाराम कोळेकर:-२

नोटा १

*कोनाळ पंचायत समिती*

 

उबाठा 1) सोनाली गवस :-७

सेना 2) सायली निंबाळकर :-८

अपक्ष 3) साक्षी देसाई :-१

नोटा ४

*मणेरी पंचायत समिती*

 

BJP 1) सोनिया कुबल :-१

अपक्ष 2)दीपक जाधव :-०

उबाठा 3) प्रीती धुरी :-१८

अपक्ष 4) प्रवीण गवस :-१

अपक्ष 5) संजय देसाई :-३

अपक्ष 6) अनिरुद्ध फाटक :-०

नोटा. ०

आदी टपाल मतदान मोजणी पूर्ण झाली आहे