राजापूर | प्रतिनिधी : राजापूरातील ऐतिहासिक व पसिध्द, तसेच असंख्य शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री धूतपापेश्वर देवस्थानचा महाशिवरात्र उत्सव गुरूवार दि.12 ते बुधवार दि.18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होत आहे.
यामध्ये रविवार दि.15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र यात्रा उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी पहाटे 3 वा. नित्यपूजा, श्रींवर रूद्राभिषेक, सकाळी 9 वा. गुजराळी येथील शामला कुलकर्णी यांचे भजन, 10 वा. सुरस्नेह भजनी मंडळ, पूणे, 12 वा. ह.भ.प. नरहर दामोदर करंबेळकर, कणकवली, दुपारी 2 वा. गिरीश वारे यां संगीत कार्यकम, 3 वा. दर्पण कांबळी, श्री समर्थ पासादिक भजन मंडळ यों भजन, सायं.4 वा. समर्थ महिला भजन मंडळ, भटाळी यों भजन, 7 वा. स्थानिक भजनां कार्यकम, पहाटे 3वा. श्रींची महापुजा, महानैवेद्य, 5 वा. भोवती असे कार्यकम होणार आहेत.
तर दि.12 ते 18 फेब्रुवारी या उत्सव काळात दररोज सकाळी 6वा. पारंपारिक वाद्य, 6.30 वा. नित्यपुजा, श्रींवर रूद्राभिषेक, दुपारी 2 ते 4 शयनकाल, सायं.7.30 वा. गायन, रात्री 8 वा. किर्तन, रात्री 10 वा. भोवती, 11.30वा. आरती असे कार्यकम होणार आहेत. तर गुरूवार दि.19 फेब्रुवारी रोजी महापसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा व कार्यकमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशासक अरविंद चाळके यांनी केले आहे.












