महाशिवरात्री दिनी आमनायेश्वर मंदिर दीपोत्सवाने झळाळणार..

श्री देव आमनायेश्वर सेवा मंडळाचा उपक्रम

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावाची ओळख असलेल्या प्राचीन अशा हेमाडपंथी बांधणीच्या श्री आमनायेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो.यावर्षी १५ रोजी महाशिवरात्री दिनी सायंकाळी ७ ते ८.३०या वेळेत मंदिरात व मंदिराच्या सभोवातली दीपोत्सव साजरा होणार आहे.
यावेळी मंदिर व मंदिर परिसरात सुमारे १५०० तेलाचे दिवे लावण्यात येणार आहे.या दीपोत्सवाचे नियोजन बुरंबाड येथील लिंगायत समाजाच्या श्री देव आमनायेश्वर सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्री दिनी या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.मंदिर परिसरात भरणाऱ्या जत्रेचा एक कुतूहल पंचक्रोशीतल्या लहानांपासूनन्ते थोरामोठ्यांपर्यंत असते.यावर्षी दीपोत्सवामुळे झळाळून निघणाऱ्या मंदिराचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.अशा पद्धतीचा दीपोत्सव प्रथमच होत असल्याने भाविकांना पर्वणीच ठरणार आहे.
श्री देव आमनायेश्वर मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेला सर्वत्र दिवे लावले जातात.महाशिवरात्री दिनी दीपमाळ प्रज्वलित केल्या जातात.परंतु या सोबतच दीपोत्सवाचे आयोजन दुग्ध शर्करा योग होणार आहे.
अनेक वर्षांचा इतिहास सांगणारे श्री देव आमनायेश्वर मंदिर हे पुरातन असून,भाविकांचे श्रद्धास्थान आहे.महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव आमनायेश्वर सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.