मसुरे (प्रतिनिधी ):मूळ देवबागचे सुपुत्र व म्हापण मडवळवाडी येथील रहिवाशी
लेखक, दिग्दर्शक, नाटककार व
रंगकर्मी विनय अच्युत केळुसकर( ६८ वर्षे ) यांचे ९ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, जावई, विवाहीत भाऊ,
बहिणी, भावजय, नातवंडे असा
परिवार आहे. आता पर्यंत त्यांनी
लिहिलेली २५ नाटकें, एक कादंबरी
व तीन चरित्र ग्रंथ प्रकाशित झाले
आहेत.’कोंडमारा’हे त्यांचे त्या काळातील गाजलेले व्यावसायिक
नाटक.संत नामदेव महाराजांचे ते
निस्सिम भक्त होते. गेली सुमारे १०
वर्षे पंचक्रोशितील नवोदीत कला-
काराना प्रोत्साहन देवून मार्गदर्शन
करण्यासाठी श्री माऊली प्रतिष्ठान
पाट पंचक्रोशी नावाची नाट्य संस्था
स्थापन केली आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी म्हापण, पाट, कोचरा, निवती, खवणे, देवबाग आदी भागातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.












