आंगणेवाडी जत्रेत विधीसेवेबाबत जनजागृती!

मसुरे | झुंजार पेडणेकर : आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रोत्सवानिमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती, मालवण यांच्यामार्फत यात्रेकरूंमध्ये विधीसेवेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष दालन उभारण्यात आले होते.

राज्याचे मत्सविकास व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या कक्षाला भेट देऊन माहिती घेतली.

या उपक्रमांतर्गत यात्रेमध्ये उपस्थित यात्रेकरू व नागरिकांना मोबाईल व्हॅनद्वारे लोकअदालत योजना, राष्ट्रीय लोकन्यायालय, मध्यस्थी प्रक्रिया, बालकांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, विधी सेवा प्राधिकरणाचे कायदेविषयक कार्य, रॅगिंग प्रतिबंधक कायदा, गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा,

वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, माजी सैनिकांसाठी वीर परिवार सहायता योजना-२०२५ तसेच महत्त्वाच्या कायदेशीर विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप विधी सेवांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक अधीक्षक सदाशिव एन. पालव, तालुका विधी सेवा समिती, मालवणचे पॅ नेल लॉयर्स ऍड. अक्षय सामंत, अॅड. प्राजक्ता गावकर, अॅड. सुमित जाधव, कनिष्ठ लिपीक मिलिंद जाधव, वरिष्ठ लिपिक जे. टी. फर्नांडीस, विधी स्वयंसेवक संदेश कोरगावकर, प्रथमेश देसाई, पूजा कुबल, वत्सला मणचेकर, तत्कालीन विधी स्वयंसेवक विजय कांबळी तसेच चपराशी डी. एस. चव्हाण व पी. ए. तारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.