बांदा : प्रतिनिधी
बांदा येथील तेतेबाई उर्फ सुमती मंगेश कल्याणकर (वय ८६) यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, विवाहीत मुलगी, सूना, नातंवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिथयश सीए साईप्रसाद कल्याणकर यांच्या आई तर सिने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्या त्या आजी होत. मंगळवारी सकाळी ९ वाजता बांदा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
——–











