मोठ्या संख्येने भाविकांनी घेतले दर्शन
कोट्यावधी रूपयांची उलाढाल
मोड यात्राही हाऊसफुल्ल
सोमवारी रात्री समुद्रकिनाèयावरील दुकानांमध्ये पाणी शिरले
व्यावसायिकांची उडाली तारांबळ
देवगड : प्रतिनिधी
देवस्वाèयांच्या व भाविकांच्या पवित्र तिर्थस्नानाने दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेची सांगता झाली. मात्र मंगळवारी रात्रीपर्यंत सुरू असलेल्या मोड यात्रेला भाविकांची अलोट गर्दी होती.सोमवारी रात्री भरतीच्या उधाणाचे पाणी समुद्रकिनाèयावरील दुकानांमध्ये शिरल्याने एकच तारांबळ उडाली.व्यावसायिकांचे साहित्यही विस्कळीत झाले यावेळी स्थानिक स्वयंसेवक व प्रशासनाने धावाधाव करून मदतकार्य राबविले.
रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या यात्रेची सांगता तिसèया दिवशी पवित्र तीर्थस्नानाने झाली.मंगळवारी अमावास्येची पर्वणी असल्यामुळे यात्रेच्या तिसèया दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता. जिल्ह्यातून कुणकेश्वर भेटीसाठी व तिर्थस्नानासाठी श्री देव qलगेश्वर पावणाई देवस्थान जानवली कणकवली, श्री देव नागेश्वर पावणादेवी नागवे कणकवली, श्री पावणाई रवळनाथ देवस्थान मालोंड बेलाचीवाडी मालवण, श्री देव गांगेश्वर देवस्थान नारींग्रे देवगड या चार देवस्वाèया आल्या होत्या. देवस्वाèयांनी मंगळवारी पहाटेपासुन समुद्रात तीर्थस्नानाला जाण्यास सुरूवात केली.देवस्वाèयांबरोबरच तिर्थस्नान करण्यासाठी लाखों भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.तिर्थस्नान करून परत श्री कुणकेश्वरचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
पहाटे तीन वाजल्यापासुन समुद्रकिनाèयावर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. देवस्वाèया व भाविकांच्या तीर्थस्नानावेळी समुद्रकिनारी सुरक्षा ठेवण्यात आली होती.आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस, स्वयंसेवक समुद्रकिनारी सज्ज होते.तीर्थस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मंदीर व्यवस्थापन व प्रशासनामार्फतही दक्षता घेण्यात आली होती.सोमवारी रात्री ११ वा.सुमारास समुद्राच्या भरतीचे पाणी समुद्रकिनाèयावर असलेल्या दुकानांपर्यंत पोहचल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली.प्रशासन व स्थानिकांनी धावाधाव करून व्यापाèयांसाठी मदतकार्य राबविले.
देवस्वाèयांनी तीर्थस्नान करून व देवदर्शन घेवुन परतीचा प्रवास केला.मंगळवारी सायंकाळपर्यंत भाविकांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले.कुणकेश्वर येथे यात्राकालावधीत प्रसिध्द भजनीबुवाची भजने झाली.तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले तर कोट्यावधी रूपयांची उलाढाल झाली.
कुणकेश्वर येथे थाटण्यात आलेली व्यापाèयांच्या दुकानांमध्ये तिसèया दिवशीही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. यात्रेची सांगता होत असली तरी येथील स्थानिक ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. एस्टी महामंडळाने भाविकांना चांगली प्रवाशी सेवा दिली. यात्रेच्या धार्मिकतेला कोणत्याही प्रकारची इजा पोहचु नये,यात्रा शांततेमध्ये सुरळीत पार पाडावी यासाठी पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवक काम करत होते.यावर्षी भाविकांना दर्शनाची व्यवस्था चांगल्याप्रकारे केल्याबद्दल भाविकांनी देवस्थान टड्ढस्टच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.देवस्थान टड्ढस्ट,कुणकेश्वर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रेचे चांगल्या पध्दतीने नियोजन केल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.












